आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anju Mahendru Was Linked Up With Rajesh Khanna And Gary Sobers

राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम होत्या अंजू, इंडिज क्रिकेटर गैरीसोबतही दिर्घकाळ होते अफेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अंजू महेंद्रु 69 आज (11 जानेवारी) वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवलेल्या अंजू प्रेमाच्या बाबतीत मात्र अपयशी ठरलेल्या. अपयशी प्रेम आणि लग्नानंतर त्यांनी एकांतात आयुष्य घातले.
अंजू हिंदी सिनेमांचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम होत्या. परंतु त्यांने नाते काही काळच टिकले. 1960 दशकाच्या शेवटी अंजू आणि राजेश यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा सर्वत्र होत्या. परंतु राजेश यांच्या स्वभावामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. राजेश यांना अंजू यांनी सिनेमांत काम करणे पसंत नव्हते. पण अंजू यांना आपले करिअर उभा करायचे होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत. ब्रेकअपनंतर राजेश यांनी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला.
वेस्ट इंडिज क्रिकेट खेळाडू गैरी सोबर्ससोबत केला साखरपुडा आणि मध्येच संपुष्यात आले नाते
राजेश खन्ना यांच्याशिवाय वेस्ट इंडिजचा बॅट्समन गैरीवर अंजू यांनी प्रेम केले. दोघे एकमेकांविषयी गंभीर होते. हे अफेअर साखरपुड्यापर्यंत गेले, परंतु दोघे अचानक वेगळे झाले. सोबर्सने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये या प्रेमाला उल्लेख करून सांगितले होते, की अंजूचे आई-वडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते. त्यांनी माझ्याबाबतीत वर्णभेद केला. त्यामुळे आमचे नाते टिकले नाही.
मात्र, दोन अपयशी प्रेमानंतर अंजू यांनी एका उद्योगपतीसोबत विवाह थाटला. मात्र, हे नातेदेखील काही काळच टिकू शकले आणि अंजू पुन्हा एकट्या पडल्या.
बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्या प्रेमकहाण्या नेहमीच चर्चेत राहतात. त्यामध्ये काहींचे ब्रेकअप झाले. आज आम्ही तुम्हाला पॅकेजमधून अशाच जोड्यांविषयी सांगत आहोत. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या ब्रेकअपविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...