आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankush Choudhary Play Photographer In Sanshaykallol Marathi Film

PHOTOS: अभिनेता अंकुश चौधरी बनला फोटोग्राफर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये भूमिकांमधील वैविध्य जपणारा आणि त्यासाठी मेहनत घेणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. आपल्या प्रत्येक सिनेमातील भूमिकेमध्ये, लूकमध्ये वेगळेपणा जपण्याचा अंकुश नेहमीच प्रयत्न करत असतो. अशाच वेगळ्या भूमिकेत अकुंश आता आपल्याला बघायला मिळणार आहे आगामी 'संशयकल्लोळ' या सिनेमात.

विशाल इनामदार दिग्दर्शित 'संशयकल्लोळ' या सिनेमात अंकुश एका छायाचित्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. आजच्या काळातला फॅशन ट्रेंड जपणारा आणि फॅशन स्टाईलचं फोटशूट करणारा फोटोग्राफर अंकुशने या सिनेमात साकारला आहे.

अंकुशच्या भूमिकेविषयी आणि सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...