आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉटरडॅम फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'अनुमती' आणि 'फँड्री'चे स्पेशल स्क्रिनिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पिस्तुल्या' या सिनेमासाठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' आणि गजेंद्र अहिरे यांच्या 'अनुमती' या दोन्ही मराठी सिनेमांची निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) साठी झाली आहे. 31 जानेवारी 2013 रोजी या दोन्ही सिनेमांचे स्पेशल स्क्रिनिंग या फेस्टिवलमध्ये होणार आहे.

विशेष म्हणजे गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'अनुमती' या सिनेमाने याआधी कोल्हापूर आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलही गाजवले आहे. 'अनुमती' सिनेमाने कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे.

'अनुमती' या सिनेमात विक्रम गोखले यांच्या बरोबर रीमा, आनंद अभ्यंकर, नेहा पेंडसे, नीना कुलकर्णी, किशोर कदम आदी कलाकार मंडळी आहेत तर ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेल्या ‘फँड्री’ सिनेमाची उत्सुकता आहे.
23 जानेवारी पासून सुरु झालेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) हा 3 फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहे.