आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: उटीच्या एका खेडेगावात लग्नगाठीत अडकले होते अनुराग-कल्कि, आता झाले विभक्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुराग कश्यप-कल्कि कोचलिनची दोन विविध छायाचित्रे)
मुंबई: 'ब्लॅक फ्राइडे', 'देव डी', 'गुलाल', 'गँग्स ऑफ वासेपूर'सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारा अनुराग सिंह कश्यप आज 42 वर्षांचा झाला आहे. इंडस्ट्रीमध्ये अनुराग कश्यपने 'कभी कभी' या टीव्ही सीरिजमधून एक लेखक म्हणून करिअरला केली. त्यानंतर त्याने 'सत्या' या सिनेमाची पटकथा लिहून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली. त्यानंतर 'शूल', 'जंग', 'नायक'सारख्या सिनेमांच्या पटकथा त्याने लिहिल्या.
अनुरागचे फिल्मी करिअर ज्या गतीने सुरु झाले त्याच गतीने आजही सुरु आहे. त्याच्या पर्सनल लाइफमध्ये बरेच चढ-उतार आलेत. त्याने 2003मध्ये फिल्म एडिटर आरती बजाजसह लग्न केले. मात्र केवळ 6 वर्षांतच त्यांच्यात दूरावा निर्माण झाला. 2009मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोन वर्षांनी 2011मध्ये अनुरागने सिने अभिनेत्री कल्कि कोचलिनसह संसार थाटला.
कल्किपासूनसुध्दा झाला विभक्त
41 वर्षांचा अनुराग आणि 29 वर्षांची कल्कि यांनी 30 एप्रिल 2011 रोजी मुंबईपासून जवळ असलेल्या उटीच्या कलहेटी या गावात लग्न केले. हे अनुरागचे दुसरे तर कल्किचे पहिले लग्न होते. 'देव डी'च्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. कल्किने अनुराग दिग्दर्शित 'शैतान' आणि 'दॅट गर्ल इन यलो बूट्स' या सिनेमात काम केले होते. दोघांनी लग्न तर केले मात्र त्यांच्यात खूप लवकर दूरावा निर्माण झाला.
त्यांनी मीडियात सांगितले, 'आम्ही एकमेकांपासून विभक्त होत आहोत. जेणेकरून आहे ती परिस्थिती सांभाळू शकू. परंतु आम्ही घटस्फोट घेत नाहीये. आम्ही माध्यमांना विनंती करतो, की आमच्या खासगी आयुष्याला खासगीच राहू द्यावे. आभार- कल्कि आणि अनुराग'
अनुराग आणि कल्कि दोघे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. दोघांचा घटस्फोट झालेला नाहीये. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दोघांच्या लग्नाची काही छायाचित्रे...