आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अग्ली’बाबत अनुराग कश्यपची तडजोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक वर्षापासून तयार असलेल्या ‘अग्ली’बाबत अनुरागने सेन्सॉर बोर्डालाच आव्हान दिले होते. सेन्सॉर बोर्डाच्या म्हणण्यानुसार त्याने धूम्रपान निषेधाचे फुटेज आणि इशारा सिनेमात टाकण्यास नकार दिला होता. अनुरागचे असे म्हणणे आहे की, सिनेमातील अशा इशार्‍यामुळे प्रेक्षकांचे लक्ष विचलित होते.
अनुरागने भारत सरकारच्या धूम्रपानविरोधी मोहिमेचा आपल्या सिनेमात समावेश करण्यास नकार देत आरोग्य मंत्रालयाने सिगारेट-तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध लावावेत असे सांगितले. भलेही माझा सिनेमा प्रदर्शित झाला नाही तरी चालेल पण, सिनेमात वैधानिक इशारा टाकणार नसल्याचे अनुरागने सांगितले होते. मात्र, आता काही महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्याने स्पष्ट केले आहे की, तो निर्मात्यांचे होत असलेले नुकसान पाहू शकत नाही. त्याने औपचारिकता पूर्ण करून सिनेमा प्रदर्शित करण्यास मंजुरी दिली आहे.
तो लवकरच न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन सरकारसमोर आपला सिनेमा सादर करणार आहे. ‘अग्ली’ची निर्मिती कंपनी असलेल्या डार मोशन पिरने सांगितले की, सिनेमा भारतात प्रदर्शित करण्याची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे.