आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anushka Sharma And Rahul Bose Snapped At The Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: एअरपोर्टवर दिसले अनुष्का-राहूल, जोया अख्तरच्या सिनेमात झळकणार एकत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहूल बोस आणि अनुष्का शर्मा
मुंबई: शनिवारी रात्री (21 जून) मुंबई एअरपोर्ट बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि राहून बोस दोघे एकत्र दिसले. दोन्ही स्टार्स 'दिल धडकने दो'च्या शुटिंगसाठी बाहेर जात होते. या सिनेमाचे दिग्दर्शन जोया अख्तर करत आहे. 'लक बाय चान्स' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'सारख्या सिनेमाचे दिग्दर्शनही तिने केले आहे.
एअरपोर्टवर अनुष्का खूप सिंपल लूकमध्ये दिसली. तिने पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि फिका निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. यादरम्यान अनुष्का विदाउट मेकअप दिसली. तिने केस खुले ठेवलेले होते आणि निळ्या रंगाचे शुज घातलेले होते. तसेच राहूल बोस निळ्या रंगाचे जॅकेट आणि टी-शर्ट आणि क्रिम रंगाच्या जीन्समध्ये दिसला. दोन्ही स्टार्सना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. बातम्यांनुसार अनुष्का या सिनेमात राहूनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
या वर्षी अनुष्काचा 'बॉम्बे वेलवेट' आणि 'एनएच 10' हे सिनेमे रिलीज होणार आहेत. 'बॉम्बे वेलवेट'मध्ये ती रणबीर कपूरसह दिसणार आहे. हा सिनेमा 28 नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अनुष्काने जाज गायिकेची भूमिका साकारली आहे. सोबतच, ती रेट्रो लूकमध्ये दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा मुंबई एअरपोर्टवर अनुष्का आणि राहूलची छायाचित्रे...