आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma And Virat Kohli Will Be Engaged In Summer

लग्नागाठीत अडकणार Love Birds, अनुष्का-विराटचा उन्हाळ्यात होणार साखरपुडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अनुष्का शर्म आणि विराट कोहली)
मुंबई- Love Bird अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याचे सांगितले जाते. बातमी आहे, की यावर्षी उन्हाळ्यात दोघे साखरपुडा करणार आहे, अशी माहिती विराट-अनुष्काच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. विराट आणि अनुष्का दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
2014मध्ये दोघांचे अफेअर ऑकलँडमध्ये हातात हात घालून फिरत असताना समोर आले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअममध्ये श्रीलंकेच्या विरुध्द भारत या सामन्यादरम्यान अर्धशतक करताना विराट कोहलीने व्हिआयपी बॉक्समध्ये बसलेल्या अनुष्का शर्माला फ्लाइंग Kiss केले होते. त्यावेळीसुध्दा दोघांच्या प्रेमाची चाहूल अनेकांना लागली होती. एवढेच नव्हे, विराट आणि अनुष्काने काही मुलाखतीदरम्यान सांगितले, की ते एकमेकांना डेट करत आहेत. विराटने सांगितले होते, 'जे आहे ते तुमच्यासमोर आहे, ते पाहून लोकांनी समजून घ्यावे'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्का-विराटची छायाचित्रे...