आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: बालपणापासूनच कुटुंबीयांची लाडकी आहे अनुष्का, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2008 मध्ये यशराज बॅनरच्या 'रब ने बना दी जोडी' या सिनेमाद्वारे एक नवा चेहरा रुपेरी पडद्यावर झळकला होता. हा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. अनुष्काला पहिल्याच सिनेमात किंग खान शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती. अनुष्का-शाहरुख स्टारर हा सिनेमा हिट ठरला होता. अनुष्काने सिनेमातील आपल्या डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ती आता बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज अनुष्काने आपल्या वयाची 26 वर्षे पूर्ण केली आहेत. अर्थातच आज या बबली गर्लचा वाढदिवस आहे.
1 मे 1988 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये जन्मलेल्या अनुष्काचे वडील कर्नल अजय कुमार आर्मी ऑफिसर आहेत, तर आई आशिमा शर्मा गृहिणी आहे. अनुष्का बालपणापासूनच आपल्या कुटुंबीयांची लाडकी आहे. आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या छायाचित्रांमधून तुम्हाला हे दिसून येईल.
एकापाठोपाठ हिट सिनेमे देणा-या अनुष्काला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
अनुष्काचे सिनेमे
रब ने बना दी जोड़ी (2008)
बदमाश कंपनी (2010)
बँड बाजा बारात (2010)
पटियाला हाउस (2011)
लेडीज Vs रिकी बहल (2011)
जब तक है जान (2012)
मटरू की बिजली का मंडोला (2013)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अनुष्काच्या बालपणीची खास छायाचित्रे...
(ही सर्व छायाचित्रे अनुष्काच्या फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)