मुंबईः अनुराग कश्यप यांच्या आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमातील अनुष्का शर्माचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. स्मोकी आइज, रेट्रो लूक, विंटेज हेअर स्टाइल आणि हातात माइक घेतलेल्या अनुष्का हा अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करणारा आहे.
या सिनेमात अनुष्काने रोजी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात 60च्या दशकातील प्रभाव असून अनुष्काच लूकदेखील याच काळातील आहे. बुधवारी अनुष्काने
आपल्या या लूकचे छायाचित्र सोशल नेटवर्किंग साइटवर चाहत्यांसाठी शेअर केले.
अनुष्कापूर्वी या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता
रणबीर कपूरच्या फस्ट लूकचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या सिनेमात रणबीरने स्ट्रीट फायटर जॉनी बलराजची भूमिका साकारली आहे. 'बॉम्बे वेलवेट'मध्ये के.के. मेनन आणि करण जोह व्हिलनच्या भूमिकेत झळकणार आहेत. यावर्षी 15 मे रोजी सिनेमा
बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बॉम्बे वेलवेट'मधील अनुष्का आणि रणबीरच्या लूकची खास झलक...