आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Leaves For Barcelona, To Join Ex Beau Ranveer Singh On Set

'दिल धडकने दो'साठी अनुष्का रवाना, EX-BOYFRIENDसह करणार रोमान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' सिनेमाच्या शुटिंगसाठी गुरूवारी (29 मे) मुंबईच्या एअरपोर्टहून बार्सिलोनासाठी रवाना झाली आहे. खास गोष्ट आहे, की या सिनेमामध्ये तिचा को-स्टार माजी प्रियकर रणवीर सिंह आहे.
अनुष्का मुंबई एअरपोर्टवर कॅज्युअल जीन्स, शर्ट आणि बेसबॉल कॅपसुध्दा परिधान केलेली होती. परंतु शर्टवर अनुष्काचे जॅकेट मात्र तिच्या स्टाइलला वेगळे लूक देत होते. एअरपोर्टवर अनुष्काने फोटोग्राफरला अनेक नकळत पोझ दिल्या.
अलीकडेच, अनुष्काने जोधपूरमध्ये आपल्या होम प्रॉडक्शन 'NH 10' या सिनेमाचे शुटिंग केले. या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का प्रॉडक्शन क्षेत्रातसुध्दा पदार्पण करत आहे. यापूर्वी अशीही बातमी आली, की ती शुटवर जाण्यापूर्वी तिचा बॉयफ्रेंड आणि भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू विराट कोहली तिला भेटण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचला.
अनुष्काच्या व्यस्त वेळापत्रकाकडे बघता विराट आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पोहोचला आहे. या जोडीने अनेकदा एकत्र वेळ घालवलेला आहे. सध्या अनुष्का आपला माजी प्रियकर रणवीरसह दोन महिने बर्सिलोनामध्ये रोमान्स करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा बर्सिलोनासाठी रवाना होत असलेल्या अनुष्काची काही खास छायाचित्रे...