आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Speak On The AIB Roast Controversy

अनुष्काने एआयबी शोमधील कॉमेडी घेतली हसण्यावारी, जाणून घ्या काय म्हणाली?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माती म्हणून ‘एनएच १०’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील चर्चेला अनुष्काने गंभीर घेतले नाही. यात तिच्या, रणवीर, विराट आणि दीपिका यांच्या अफेअरवर विनोद करण्यात आले होते.
तो बिकिनी नसून, वन पीस सूट आहे. आम्ही प्रामाणिकपणे चित्रपट निर्मिती केली आहे. ‘एनएच१०’मधील बिकिनी दृश्यांवर बोलताना..
मुंबईमध्ये गुरुवारी ‘एनएच १०’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. नवदीप सिंह दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे अनुष्का निर्माती म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. या कार्यक्रमात चित्रपटामध्ये अनुष्काचा सहकलाकार असलेल्या नील भूपलमचीदेखील उपस्थिती होती. या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अनुष्काला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
एआयबी हा असा सार्वजनिक शो ठरला ज्या ठिकाणी अनुष्काच्या रणवीर सिंह आणि विराट कोहलीशी अफेअर असल्याच्या चर्चेवर खुलेपणाने कॉमेडी करण्यात आली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या दीपिका-रणवीरने या चर्चेचे खंडन करण्याऐवजी हसत राहण्यामध्ये समाधान मानले. अनुष्काला याबाबत विचारले असता तिने सांगितले की, ‘मी या शोचे जितके व्हिडिओ पाहिले ते सर्व केवळ हास्यास्पद होते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी तरी त्याचे मत व्यक्त करतो आणि आपण नाराज होतो. तसे करता आपण जसे आहोत, तसेच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही चर्चा निष्कारण रंगवली जात आहे.’
मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘एनएच १०’वरून आपण आनंदी असल्याचे अनुष्काने म्हटले आहे. या चित्रपटात अनुष्काची अॅक्शन भूमिकादेखील आहे. तिने सांगितले की, ‘अॅक्शन दृश्यांचा समावेश आहे पण ओढूनताणून त्याचा समावेश केला नाही. कथेमध्ये प्रत्येक स्तरातील प्रेक्षकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मला चित्रपटाशी पूर्णत: एकरूप व्हायचे असल्या कारणाने मी अभिनयाबरोबरच चित्रपटाची निर्माती बनले. हा अनुभव भविष्यकाळात माझ्यासाठी महत्वाचा ठरेल.’