आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: 'एनएच-10'चा ट्रेलर रिलीज, अॅक्शन रुपात अवतरली अनुष्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('एनएच-10'चा ट्रेलर बघण्यासाठी क्लिक करा..)

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी 'एनएच-10'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मनोरमा सिक्स फीट अंडर फेम दिग्दर्शक नवदीप सिंहच्या या सिनेमात अॅक्शनचा जबरदस्त तडका आहे. अनुष्का शर्मा, नील भूपलम आणि दर्शन कुमार सिनेमात मेन लीडमध्ये आहेत. अभिनयासोबत अनुष्काने या सिनेमाची निर्मितीदेखील केली आहे. या सिनेमाद्वारे ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. येत्या 6 मार्चला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सिनेमात अनुष्काच्या भूमिकेविषयी गुप्तता बाळगण्यात आली आहे. मात्र फस्ट लूकमध्ये स्वसरंक्षणासाठी तिच्या हातात एक वस्तू दिसते आहे. सिनेमाच्या पोस्टरला थ्रिलिंग लूक देण्यात आला आहे. 'पीके'मधील उत्कृष्ट अभिनय साकारलेल्या अनुष्काचा हा आगामी सिनेमा आहे. यावर्षी अनुष्काचे एकापाठोपाठ तीन सिनेमे रिलीज होणार आहे. 'एनएच-10'सोबतच अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' आणि झोया अख्तरचा 'दिल धडकने दो' हे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाचे काही पोस्टर्स...