आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AR Rehman, Honey Singh And More Bollywood Singer Income

एका गाण्याचे 20 लाख, शोचे 2 कोटी रुपये घेतात रहमान, जाणून घ्या सिंगर्सची फीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- ए. आर. रहमान)
मुंबईः फिल्म इंडस्ट्रीत अभिनेता-अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा मोठा असतो, असे म्हटले जाते. एका सिनेमासाठी हे कलाकार लाखो आणि कोटींच्या घरात मानधन घेत असतात. मात्र कमाईत बॉलिवूडचे गायकसुद्धा मागे नाहीत.
संगीतकार-गायक ए. आर. रहमान यांनी 6 जानेवारी 2015 रोजी वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. फिल्म इंडस्ट्रीत रहमान उच्च स्थानावर आहेत. एका गाण्यासाठी ते दहा ते वीस लाखांच्या घरात मानधन घेतात . तर आपल्या ग्रुपसोबत शो करण्यासाठी तो दीड ते दोन कोटी रुपये घेतात. त्यांच्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध गायिका चित्रा, हरिहरन, शिल्पा राव, बॅनी दयाल, महालक्ष्मी अय्यर आणि शिवमणी यांचा समावेश आहे.
संगीत क्षेत्रातील बेताज बादशाह आहेत रहमान...
ए. आर. रहमान यांचे पूर्ण नाव अल्लाह रक्खा रहमान असून ते संगीतकार, गायक, गीतकार आहेत. ते भारताशिवाय परदेशातसुध्दा लोकप्रिय आहेत. 'स्लमडॉग मिलेनियर' आणि आपल्या म्यूझिक अल्बम 'इनफाइट लव्ह'मधून जगभरात लोकप्रियता मिळवणारे ए. आर रहमान यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अॅकॅडमी अवॉर्ड, ग्रॅमी अवॉर्ड, बाफ्टा अवॉर्ड चार वेळा नॅशनल अवॉर्ड, 15 वेळा फिल्मफेअर साऊथ अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. या अवॉर्डशिवाय इतरही पुरस्कार त्यांच्या पदरी पडले आहेत.
रहमान यांचे चर्चेतील गाणे-
1) 'जय हो...' - 'स्लमडॉग मिलेनियर' (सिनेमा)
2) 'दिल से रे...' - 'दिल से' (सिनेमा)
3) 'ख्वाजा मेरे ख्वाजा...' - जोधा अकबर (सिनेमा)
4) 'चले चलो...' - 'लगान' (सिनेमा)
5) 'ये जो देश है तेरा...' - 'स्वदेश' (सिनेमा)
6) 'देश मेरे देश मेरे...' - 'द लीजेंड ऑफ भगत सिंह' (सिनेमा)
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बॉलिवूडमधील कोणकोणते सिंगर आपल्या शोसाठी किती फीस घेतात...