आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरबाजला हवीय सुरक्षित रिलीज डेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः अरबाज खान
‘डॉली की डोली’चे शूटिंग सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिनेमाचा निर्माता असलेला अरबाज खान त्यामुळे सिनेमासाठी एक सुरक्षित डेट शोधत आहे. शिवाय तो सिनेमासाठी सोलो रिलीज डेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोनम कपूर, पुलकित सम्राट आणि राजकुमाराव राव अभिनीत या सिनेमासाठी 2015 मधील 9 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी या तारखांचा सध्या विचार केला जात आहे.
डिसेंबरमध्ये आमिर खान आणि राजकुमार हिराणीचा ‘पीके’ प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची वर्षातील सर्वात मोठय़ा सिनेमात गणना केली जात आहे. ‘डॉली की डोली’ पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचे अरबाजचे नियोजन आहे. त्यामध्ये 9 जानेवारी ही तारीख त्याला अधिक योग्य वाटते. जर या तारखेला अन्य एखादा सिनेमा प्रदर्शित होणार असेल, तर अरबाज आपल्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलून 6 फेब्रुवारीदेखील करू शकतो. मात्र अरबाजचा ‘डॉली.’ साठी सोलो रिलीज डेटचा अट्टाहास आहे.