आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: असे जवळ आले होते अरबाज-मलायका, 5 वर्षांच्या डेटिंगनंतर चढले बोहल्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - पत्नी मलायका अरोरा खानसह अरबाज खान)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिका साकारणारा अरबाज खान आज (4 ऑगस्ट) 47वा वाढदिवस साजरा करत आहे. अरबाजचे वडील सलीम खान बॉलिवूडचे यशस्वी पटकथा लेखक आहेत. तर त्याचा थोरला भाऊ सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि धाकटा भाऊ सोहेल खानसुद्धा अभिनेता-निर्माता आहे. अरबाजची पत्नी बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर मलायका अरोरा खान आहे. अरबाजने अभिनयाकडून आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. त्याने दिग्दर्शित केलेला 'दबंग 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.
करिअरची सुरुवात..
4 ऑगस्ट 1967 रोजी जन्मलेल्या अरबाजने आपल्या करिअरची सुरुवात 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'दरार' या सिनेमाद्वारे अभिनेत्याच्या रुपात केली होती. या सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. यासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलनचा अवॉर्डसुद्धा मिळाला होता. सिल्व्हर स्क्रिनवर अरबाजने सलमानसह यशस्वी सिनेमे दिले. त्यामध्ये 'प्यार किया तो डरना क्या', 'गर्व' या सिनेमांचा समावेश आहे. यासह 'कयामत', 'हलचल', 'मालामाल वीकली', 'भागम भाग' या सिनेमांमध्येही अरबाज झळकला आहे.
अरबाज-मलायकाची लव्ह स्टोरी...
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर मलायका अरोरा खान अरबाज खानची पत्नी आहे. या दोघांची लव्ह स्टोरी रंजक आहे. 1993 मध्ये 'मिस्टर कॉफी' या जाहिरातीसाठी अरबाज आणि मलायकाला साइन करण्यात आले होते. ही जाहिरात एवढी बोल्ड होती, की त्यावरुन वादाला तोंड फुटले होते. या वादादरम्यान मलायका आणि अरबाज यांच्यातील जवळीक वाढली होती. दोघे आपला बराच वेळ एकत्र घालवू लागले होते. या दोघांनी काही अल्बममध्येही एकत्र काम केले. 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अरबाज-मलायकाची खास छायाचित्रे...