आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arbaaz Khan And Malaika Came Close During The Coffee Add Shoot

कॉफीच्या जाहिरातीदरम्यान जवळ आले होते अरबाज-मलायका, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - पत्नी मलायका अरोरा खानसह अरबाज खान)
मुंबई - सलीम खान यांचे कुटुंब बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. सलीम खान स्वतः एक प्रसिद्ध पटकथा लेखक आहेत. त्यांची तिन्ही मुले सलमान, अरबाज आणि सोहेल बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. या तिघांमध्ये सलमान खान सर्वाधिक प्रसिद्ध आहे. त्याचे सिनेमात असणे ही हिटची गँरंटी समजले जाते.
संपूर्ण खान कुटुंब सध्या अर्पिता खान हिच्या लग्नाच्या तयारी व्यस्त आहे. उद्या (18 नोव्हेंबर) अर्पिता हिचे लग्न हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये होणार आहे. अर्पितापूर्वी सलीम खान यांची मुले अरबाज, सोहेल आणि मुलगी अलविरा यांचे लग्न झाले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अरबाज खानच्या लग्नाविषयी सांगत आहोत. अरबाजचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा मलायका अरोरासोबत झाले आहे.
अरबाज-मलायकाची लव्ह स्टोरी...
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर मलायका अरोरा खान अरबाज खानची पत्नी आहे. या दोघांची लव्ह स्टोरी रंजक आहे. 1993 मध्ये 'मिस्टर कॉफी' या जाहिरातीसाठी अरबाज आणि मलायकाला साइन करण्यात आले होते. ही जाहिरात एवढी बोल्ड होती, की त्यावरुन वादाला तोंड फुटले होते. या वादादरम्यान मलायका आणि अरबाज यांच्यातील जवळीक वाढली होती. दोघे आपला बराच वेळ एकत्र घालवू लागले होते. या दोघांनी काही अल्बममध्येही एकत्र काम केले. 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे.
अनेकदा संकटात आले नाते...
अरबाज आणि मलायका यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेकदा वाददेखील निर्माण झाले. मात्र या दोघांनी या वादांचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ दिला नाही. 2007 मध्ये बातमी आली होती, की अरबाजची एका तरुणीसोबत जवळीक वाढली असून तो लवकरच तिच्यासोबत लग्न करणार आहे. मात्र काही दिवसांतच ही बातमी केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. इतकेच नाही तर मलायकाचेदेखील विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा होती. मात्र नेहमीप्रमाणे ही गोष्टही अफवा ठरली. हे दोघे बी टाऊनमधील रोमँटिक कपल म्हणून ओळखले जातात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अरबाज-मलायकाची खास छायाचित्रे...