आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: एकेकाळी B-ग्रेड सिनेमांमध्ये देत होती बोल्ड सीन्स, आता बनली 'लाफ्टर क्वीन'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री आणि टीव्ही शोची परिक्षक अर्चना पूरणसिंग)
मुंबई: टेलिव्हिजन जगात हसण्याच्या बाबतीत नवजोतसिंग सिध्दू आणि अर्चना पूरणसिंग यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. केवळ हसण्याच्या बळावर ओळख निर्माण करणे सामान्य बाब नाहीये. परंतु अर्चनाचे हास्य सामान्यपासून खास बनले आहे. तिच्या हास्याने टीव्हीवर एक नवीन ओळख तिला मिळवून दिली. जेव्हा कधी विनोदांवर हसण्याचा आवाज कानावर पडतो, तेव्हा अर्चनाचे नाव चटकन लक्षात येते.
1982मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अर्चना आज 52वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्चनाच्या हसण्याची कमाल आहे, की ती आजही सिनेमांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारताना दिसते. अर्चना 18व्या वर्षी देहरादूरहून मुंबईला अनेक स्वप्न उराशी बाळगून आली होती. परंतु तिला यश मिळवण्यासाठी 8 वर्षांची मेहनत घ्यावी लागली. अर्चना सध्या टीव्हीवर एक कॉमेडी परिक्षक म्हणून यशस्वी झाली आहे. तिला लाफ्टर क्वीन नावसुध्दा मिळाले आहे.
नसीरुद्दीन शाहसोबत मिळाले यश
अर्चनाला 1987मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत 'जलवा' सिनेमातून मोठे यश मिळाले. ही सिनेमा सुपरहिट झाला होता. तिचा 'निकाह' हा पदार्पणाचा सिनेमा होता. अर्चनाला सिनेमा मिळत नव्हते तेव्हा तिने बी-ग्रेड सिनेमांचा आधार घेतला. अनेक सिनेमांत तिने बोल्ड सीन्स दिले. मात्र, त्यानंतर तिने 'अग्निपथ', 'सौदागर', 'शोला और शबनम', 'राजा हिंदुस्तानी'सारख्या सिनेमांतही काम केले. सिनेमांत अर्चनाने आयटम नंबरदेखील केले आहेत. तिने गोविंदाच्या 'बाज' आणि सुनील शेट्टीच्या 'जज मुजरिम' सिनेमांत आयटम साँग केला आहे. 'मोहब्बते', 'क्रिश', 'कुछ कुछ होता है', 'मस्ती', 'बोल बच्चन'सारख्या सिनेमांत तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.
छोट्या पडद्यावरील यश
अर्चनाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. परंतु एक मुख्य अभिनेत्री म्हणून कधीच यश मिळवू शकली नाही. तिने 1993मध्ये 'वाग, क्या सीन है'पासून छोट्या पडद्यावर झळकली. हा कार्यक्रम यशस्वी राहिला होता. त्यानंतर तिने 'जाने दो पारो', 'श्रीमान श्रीमती', 'अर्चना टॉकीज'सारख्या अनेक टीव्ही प्रोग्राममध्ये काम केले. 2005मध्ये डान्स शो 'नच बलिये'मध्ये अर्चनाने पती परमीत शेट्टीसह सहभाग घेतला होता. 2006मध्ये तिने 'झलक दिखला जा' होस्ट केला होता. याचवर्षी सोनी चॅनलवर येणा-या कॉमेडी शो 'कॉमेडी सर्कस'ची परिक्षक बनली होती. छोट्या पडद्यावरील 'कॉमेडी सर्कस' या विनोदी शोमधून तिने नवीन यश गाठले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'लाफ्टर क्वीन' अर्चना पूरणसिंगची निवडक छायाचित्रे...