आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा B'day Boy अर्जुनची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या त्याच्याविषयी बरेच काही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दसल सांगायचे झाल्यास त्याचा जन्म 26 जून 1985 रोजी मुंबईतील चेंबुरमध्ये झाला. निर्माते बोनी कपूर आणि मोना शौरी यांचा तो मुलगा आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर त्याचे आजोबा आहेत. तो अनिल कपूर आणि संजय कपूर यांचा पुतण्या
आणि सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे.
अर्जुनला एक धाकटी बहीण असून तिचे नाव अन्शुला कपूर आहे. श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर अर्जुनच्या सावत्र बहिणी आहेत. अर्जुनला भावी आयुष्यात दिग्दर्शक बनण्याची इच्छा आहे.
करिअरची सुरुवात...
अर्जुन कपूरने आपल्या करिअरची सुरुवात 2005 साली सहायक निर्माताच्या रुपात केली होती. अर्जुनचा सहायक निर्माताच्या रुपातील पहिला सिनेमा म्हणजे 'नो एन्ट्री'. त्यानंतर सलमान खानच्या 'वाँटेड' (2009) या सिनेमासाठीही त्याने सहायक निर्माता म्हणून काम केले होते. 'मिलेंगे मिलेंगे' या सिनेमाचा अर्जुन को-प्रोड्युसर होता. याशिवाय शक्ति द पॉवर (2002), कल हो ना हो (2003) आणि सलाम-ए-इश्क (2007) या सिनेमांसाठी अर्जुनने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
मोठ्या पडद्यावरील एन्ट्री...
अर्जुनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात यशराज बॅनरच्या 'इश्कजादे' या सिनेमाद्वारे केली. हबीब फैजल दिग्दर्शित या सिनेमात अर्जुनबरोबर परिणीती चोप्रा मेन लीडमध्ये होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय समीक्षकांनीही अर्जुन कपूरचे कौतूक केले.
अर्जुनचा दुसरा सिनेमा म्हणजे 'औरंगजेब'. भली मोठी स्टारकास्ट असूनसुद्धा या सिनेमाला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. या सिनेमात अर्जुनच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सलमा आगाची मुलगी साशा आगा होती. हा साशाचा पहिला सिनेमा होता. अर्जुनचा दुसरा
सिनेमासुद्धा यशराज बॅनरचा होता.
'गुंडे', '2 स्टेट्स' हे अर्जुनचे अलीकडच्या काळात रिलीज झालेले सिनेमे आहेत. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर यशाची चव चाखली आहे. एका दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकचीही ऑफर अर्जुनला आली आहे.
सलमान खान मेंटर...
बॉलिवूडमध्ये सलमान खान अर्जुनचा मेंटर आहे. सुरुवातीला या दोघांचे मैत्रीचे नाते नव्हते. मात्र बोनी कपूर यांच्या विनंतीवरुन सलमानने अर्जुनची जबाबदारी घेतली. त्याचे वजन कमी करण्यापासून ते अभिनयापर्यंतचे धडे सलमानने अर्जुनला दिले. फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी अर्जुनचे वजन तब्बल 140 किलो होते. सलमानच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने आपले 60 किलो वजन कमी केले.
अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा त्याची बालपणापासून ते आत्तापर्यंतची काही निवडक छायाचित्रे...