मुंबईः गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लिंकअपच्या बातम्या मीडियाच येत आहेत. अलीकडेच या दोघांनी इस्तंबूलमध्ये एकत्र सुटी घालवल्यामुळे यांच्या अफेअरच्या बातम्यांनी आणखीच जोर धरला आहे. इस्तंबुलमध्ये दोघांच्या चाहत्यांनी त्यांना एकत्र बघितले आणि ही बातमी
ट्विटरवर शेअर केली. सुटी एन्जॉय करुन मुंबईत परल्यानंतर सर्वत्र या दोघांच्या अफेअरच्या चर्चा अधिक रंगू लागल्या आहेत.
सतत येणा-या लिंक अपच्या बातम्यानंतर अर्जुनने पहिल्यांदा यावर
आपले मौन तोडले आहे. एका वेबसाइटला स्पष्टीकरण देताना अर्जुन फक्त एवढेच म्हणाला, की मी सोनाक्षीसोबत रिलेशनशिपमध्ये नाहीये.
या दोघांच्या नात्याविषयी बोलताना अर्जुनच्या एका मित्राने सांगितले, की हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. एकाच शाळेत दोघांचे शिक्षण झाले. आगामी 'तेवर' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचे बाँडिंग आणखीन स्ट्राँग झाले. हे दोघे सुटी एन्जॉय करण्यासाठी एकत्र इस्तंबुलला गेले होते, हे खरे आहे. मात्र याचा अर्थ दोघांचे अफेअर आहे असा होत नाही.