आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Kapoor First And Only Serious Relationship So Far Was With Arpita Khan

अर्जुनचा खुलासा, \'सलमानच्या बहिणीसोबत होते सीरिअस अफेअर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर भावूक आणि संवेदनशील व्यक्ति आहे. मात्र जेव्हा तो कुणासमोर येतो, तेव्हा तो स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवतो. अर्जुनने अकरावीत असतानाच शिक्षण अर्धवट सोडले. त्यावेळी त्याचे वजन 140 किलो होतो. आई-वडील विभक्त झाले होते. एवढ्या सर्व परिस्थितीत तो खचून गेला नव्हता. सलमानच्या पाठिंब्याने त्याला हिंमत मिळाली आणि आज तो बॉलिवूडमधील यंग ब्रिगेडपैकी एक आहे. सलमाननेच अर्जूनला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. सलमान नेहमीच अर्जुनसाठी एक मित्र, भाऊ आणि वडिलांसमान आहे. सलमाननेच विश्वास व्यक्त केला होता, की अर्जुन एक दिवस मोठा स्टार होईल.
अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला '2 स्टेट्स' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या रिलीजपूर्वी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला अर्जुनने मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान अर्जुनने फिल्मी करिअर, रिलेशनशिप, कुटुंब आणि आलियाविषयीच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
या मुलाखतीत अर्जुनला त्याच्या सीरिअस रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारला गेला, या प्रश्नाचे उत्तर देताना अर्जुन म्हणाला -
- ''माझे पहिले नाते हे अर्पिता खानसोबत होते. मी तिच्याविषयी खूप गंभीर होतो. त्यावेळी मी 18 वर्षांचा होतो. त्यावेळी आम्ही एकमेकांकडे बघणे सुरु केले होते. माझे सलमान भाईसोबत त्याआधीच ओळख होती. 'मैनें प्यार क्यों किया' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान माझ्या आणि अर्पिताच्या मैत्रीला सुरुवात झाली. जेव्हा आम्ही डेटिंगला सुरुवात केली, तेव्हा मला सलमान भाईची भीती वाटत होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सर्व सत्य सांगितले. शिवाय त्यांच्या संपूर्ण कुटुंबालासुद्धा आमच्या नात्याविषयी कल्पना दिली. ते सर्व खूप दयाळू आहेत. ते थोडे हैराण नक्की झाले, मात्र ते लोक नात्यांचा सन्मान करतात.''
पुढील स्लाईड्सवर वाचा, अर्जुनची संपूर्ण मुलाखत...