आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आलियासोबतच्या किसींग सीनविषयी काय म्हणाला अर्जुन?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपल्या आगामी '2 स्टेट्स' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. येत्या 18 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. ऐकिवात आहे, की अर्जुन कपूर सध्या मीडियात आलियासोबतच्या किसींग सीनविषयी स्वतःहून बोलत आहे. '2 स्टेट्स' या सिनेमात आलिया आणि अर्जुनचे किसींग सीन्स आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये त्याची झलक बघायला मिळत आहे.
मीडियात जेव्हा अर्जुनला आलियासोबतच्या किसींग सीनविषयी विचारणा झाली तेव्हा त्याने म्हटले होते, ''मला आलियाला किस करणे पसंत आहे. ती खूप चांगली किसर आहे.'' अर्जुनचे हे वक्तव्य बरेच चर्चेत आहे. मात्र आपल्या या वक्तव्यामुळे आता अर्जुन वैतागलेला दिसतोय.
ऐकिवात आहे, की अर्जुन आपल्या पीआर टीमला सांगत होता, 'मी काय म्हणणार होतो? मला आलियाला किस करणे आवडले नाही? हे फक्त सिनेमाचा एक भाग होता आणि आता तेच चर्चेत आले आहे. मी सर्वांना स्पष्टीकरण देऊन थकलो आहे.''
अर्जुनने एका न्यूज एजन्सीला मुलाखतीदरम्यान म्हटले, ''कुणाविषयी कुणी काहीही वाचत नाही. त्यामुळे मी आलियासोबतच्या किसींग सीनवरुन थोडी चेष्ठा केली, मात्र आता तेच हेडलाईन बनले आहे. आता मीडियात वारंवार आमच्या किसींग सीनवरुन प्रश्न विचारले जात आहेत आणि आम्हाला त्याची उत्तरे द्यावी लागत आहे.''
असो, अर्जुन आता स्पष्टीकरण देऊन वैतागला असला तरीदेखील, सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने त्याला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे, हे नक्की.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा '2 स्टेट्स'मधील आलिया आणि अर्जुनची खास झलक...