आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही लठ्ठ व्यक्ती आहे अर्जुन कपूर, पाहा सेलेब्सचे ऑनस्क्रिनवरील चित्र-विचित्र LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड स्टार्स अनेकदा आपल्या चित्र-विचित्र अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित
करतात. त्यांच्या विचित्र लूकने कधी-कधी त्यांना ओळखणेदेखील कठिण होऊन बसते. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सचा असा लूक यापूर्वी दिसला आहे. बातमी आहे, की अर्जुन कपूर अशाच विचित्र लूकमध्ये दिसणार आहे.
अर्जुन कपूर लवकरच काही जाहिरातींमध्ये दिसणार असल्याचे कळते. या जाहिरातीत त्याचा लूक बदलेला आहे असे सूत्रांकडून समजते. त्याचा हा लूक प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारा ठरणार आहे. पहिल्या लूकमध्ये तो लठ्ठ दिसले आणि दुस-या लूकमध्ये तो वृध्द दिसेल. त्याचे दोन्ही गेटअप चाहत्यांना हैराण करून सोडणारे आहेत. अर्जुनचा हा लूक स्वत:च्या ख-या अवतारापेक्षा खूप वेगळा आहे. यापूर्वी रुपेरी पडद्यावर स्टार्सचा असा लूक अनेकदा पाहायला मिळाला आहे.
अनिल कपूर 'बधाई हो बधाई' सिनेमात खूप लठ्ठ दिसला होता. त्यानंतर अक्षय कुमारसुध्दा 'एन्टरटेन्मेट' सिनेमात अशा लूकमध्ये दिसला आहे. अभिनेत्यांसोबत, विद्या बाललनेसुध्दा 'बॉबी जासूस'मध्ये विविध लूकमध्ये दिसली. शिवाय, अनेक स्टार्स एकदम वेगळ्या अवतारात दिसून आले आहेत. अमिताभ यांनी 'पा' सिनेमातील आपल्या लूकने सर्वांना तोंडात बोट घालायला लावले होते. हृतिकने 'कोई मिल गया'मध्ये लहान मुलाप्रमाणे पात्र साकारून सर्वांचे मन जिंकले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्सचे सिनेमातील चित्र-विचित्र आश्चर्यचकित करणारे अवतार...