आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन-मेहरने असा साजरा केला लग्नाचा 16वा वाढदिवस, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया रामपाल यांनी शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये एकत्र जेवणाचा आनंद लुटला. कालचा (28 मार्च) दिवस या दोघांसाठीही खूप स्पेशल होता. कारण काल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. यावेळी हे दोघेही मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एकत्र दिसले होते. यावेळी त्यांच्यासोबत चंकी पांडे आणि त्याची पत्नी भावना सोबत होते.
अर्जुन-मेहरच्या लग्नाचा हा सोळावा वाढदिवस होता. आपल्या खास मित्रांसोबत त्यांनी हा दिवस साजरा केला. अर्जुन-मेहर यावेळी फॉर्मल लूकमध्ये दिसले. अर्जुनने हाफ ब्लू टी शर्ट आणि कारगो पँट परिधान केला होता, तर जेसिया ब्लॅक कुर्ता आणि ब्लून जीन्समध्ये दिसली. हॉटेलबाहेर पडल्यानंतर या दोघांनी मीडियासमोर एकमेकाना अलिंगन दिले.
अर्जुनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलच्या रुपात केली होती. तर मेहर जेसियाने 1986मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. या दोघांना दोन मुली असून माहिका आणि मारया ही त्यांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्सवर पाहा अर्जुन-मेहरची खास छायाचित्रे...