आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Rampal And Jacqueline Fernandez’S Sizzling Romance In New Song Of 'ROY'

Video+Photos: 'रॉय'च्या नवीन गाण्यात दिसली अर्जुन-जॅकलिनची रोमँटिक केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('रॉय' सिनेमातील 'बूंद बूंद' या नवीन गाण्यात अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्नांडिस)
मुंबईः 'रॉय' या आगामी हिंदी सिनेमातील बूंद बूंद हे नवीन गाणे गुरुवारी रिलीज करण्यात आले आहे. अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्नांडिसवर हे नवीन गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात जॅकलिन आणि अर्जुनची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय. स्विमिंग पूलमध्ये हे दोघे रोमान्स करताना दिसत आहेत.
अंकित तिवारीच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले असून अभेन्द्र कुमार उपाध्याय या गाण्याचे गीतकार आहेत. रॉय हा सिनेमा विक्रमजित सिंह यांनी दिग्दर्शित केला असून रणबीर कपूर मेन लीडमध्ये सिनेमात झळकणार आहे. येत्या 13 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'बूंद बूंद' या गाण्यातील जॅकलिन आणि अर्जुनच्या सिझलिंग केमिस्ट्रीची खास झलक...