आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Rampal, Suzanne And Others Snapped Leaving A Nightspot.

PIX: घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर सुझानने अर्जुनसह पार्टी केली एन्जॉय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हृतिक रोशन आणि सुझान खान रोशन यांच्या घटस्फोटाची तारीख जवळजवळ निश्चित झाली आहे. अलीकडेच या दोघांनी मुंबईतील वांद्रा कौटुंबिक न्यायलयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. येत्या 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. दोघांच्या सहमतीने हा अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांना लवकरात लवकर घटस्फोट मिळण्याची शक्यता आहे. घटस्फोटानंतर हृतिकला सुझान आणि मुलांना मासिक खर्च द्यावा लागणार आहे. याशिवाय एक फ्लॅट, दोन कार आणि मुलांसाठी फिक्स्ड डिपॉझिटही हृतिकला द्यावे लागणार आहे.
घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर अलीकडेच सुझान एका नाइट पार्टीत दिसली. सुझानचे पार्टी दिसणे मोठी गोष्ट नाहीये, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्जुन रामपालसुद्धा या पार्टीत हजर होता. हृतिक आणि सुझानमध्ये दुरावा निर्माण होण्यामागे अर्जुन रामपालचे नाव असल्याचे म्हटले गेले होते. अर्जुन आणि सुझान यांच्यातील वाढणारी जवळीक घटस्फोटाचे कारण समजले जाते.
हृतिक-सुझान अद्याप कायदेशीररित्या विभक्त झालेले नाहीत, त्यामुळे सुझान आणि अर्जुनचे एकत्र दिसणे त्यांच्यातील अफेअरच्या बातम्या ख-या असल्याचे सिद्ध करत आहे. या पार्टीत सुझान आणि अर्जुनसह अभिनेता डिनो मोरिया, फॅशन डिझायनर मसाबासह अन्य स्टार्सही दिसले.
यावेळी सुझान आपल्या रेंज रोवर कारमध्ये खूप आनंदी दिसत होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्जुन आणि सुझानची पार्टी ठिकाणी पोहोचतानाची छायाचित्रे...