अभिनेता अरमान जैन
अभिनेता अरमान जैन करिश्मा, रणबीर आणि
करीना कपूर यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांची आत्या रीमा जैन यांचा मुलगा आहे. अरमान जैन बॉलिवूडमध्ये कपूर घराण्यातील नवीन स्टार आहे. दिग्गज सिनेमा निर्माते राज कपूर यांचा नातू अरमानचा 'लेकर हम दिवाना दिल' हा पहिला सिनेमा 4 जुलै रोजी रिलीज होत आहे. या सिनेमाची निर्मिती त्याचा भावोजी
सैफ अली खानने केले असून दिग्दर्शन आरिफ अलीने केले आहे. आरिफ अली इम्तियाज अलीचा भाऊ आहे. 'रॉकस्टार' फेम दिग्दर्शक-अभिनेता इम्तियाज अली आणि रबणीर यांची गट्टी आहे. दोघेही आपआपल्या भावांना सिनेमामध्ये मदत करत आहेत.
सांगितले जातेय, की सिनेमाची पटकथा आणि एडिटींगमध्ये आरिफला इम्तियाजकडून बरीच प्रशंसा मिळाली आहे. तसेच रणबीरने अलीकडेच एक फुटबॉल सामना आयोजित करून भाऊ अरमानचा आपल्या स्टारडमच्या आधारे प्रचार केला. अरमानच्या सिनेमात कोणतीही कसर राहू नये म्हणून म्यूझिक ए. आर. रहमानकडून तयार करण्यात आले आहे. म्यूझिक सिनेमाचा यूएसपी मानला जात आहे. 'खलीफा...'सारख्या पार्टी साँगने सिनेमाला रात्रीतून लोकप्रियता मिळाली. तरुणवर्ग या सिनेमाकडे आकर्षित होताना दिसत आहे.
सिनेमा रिलीज होण्यापूर्वी अरमानने सिनेमा आणि कुटुंबियांविषयी बातचीत केली...
तुझे कजिन भाऊ-बहीण यांनी सिनेमात नाव कमावले आहे, तुझ्यावर किती दबाव आहे?
दबावाविषयी सांगायचे झाले तर, मी राज कपूर यांचा नातू आहे याचा सर्वाधिक दबाव माझ्यावर आहे. परंतु मी नवखा म्हणून आलो आहे. मला वाटते भाऊ-बहिणींच्या स्टारडमचा दबाव बाळगण्यापेक्षा स्वत:ची नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा कुटुंबीय, नाना राजकपूर आणि अभिनयाविषयी काय म्हणाला अरमान...?