आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: तनिषासोबत ब्रेकअपनंतर नवीन गर्लफ्रेंडसह पार्टी एन्जॉय करतोय अरमान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या मैत्रिणीसोबत अरमान कोहली)
मुंबईः अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे आता विभक्त झाले आहेत. तनिषापासून दूर गेल्यानंतर अरमान याकाळात एका नवीन मैत्रिणीसोबत फिरताना दिसतोय. शुक्रवारी रात्री तो या तरुणीसोबत मुंबईस्थित नीडो (Nido) येथून बाहेर पडताना दिसला.
नीडोतून बाहेर पडताना अरमान फोनवर बोलत होता. त्याने ग्रे कलरचा शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. कारमध्ये जात असताना त्याच्या कारच्या मागील सीटवर एक तरुणी बसली होती. ही तरुणी कोण हे अद्याप समजू शकलेले नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तनिषापासून विभक्त झाल्यानंतर अरमान या तरुणीसोबतच ठिकठिकाणी दिसतोय. त्यामुळे ही त्याची नवीन गर्लफ्रेंड असण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे, अरमान आणि तनिषाचे ब्रेकअप झाल्यामुळे मुखर्जी आणि देवगण कुटुंब खूप आनंदी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अरमान कोहली आणि मिस्ट्री गर्लची छायाचित्रे...