आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, वर दिल्लीचा-वधू मुंबईची असताना हैदराबादमध्ये का होतंय सलमानच्या बहिणीचे लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान, सलमा खान, सलीम खान आणि अर्पिता)
मुंबईः बी टाऊनमध्ये सध्या सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खानच्या हिच्या लग्नाची चर्चा सर्वांच्या ओठी आहे. अर्पिता मुंबईची तर तिचा भावी पती आयुष दिल्लीचा आहे. मग या दोघांचे लग्न हैदराबादमध्ये का होतंय, असा प्रश्न ब-याच जणांना पडला आहे. हा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असावा. divyamarathi.comने या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे.
हैदराबादमधील फलकनुमा पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्पिता आणि आयुष लग्नगाठीत अडकणार आहे. याच ठिकाणी आपले लग्न व्हावे अशी अर्पिता खानची इच्छा होती. अर्पिताची वहिणी सीमा खान यांनी याविषयी सांगितले, की हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये आपले लग्न व्हावे असे अर्पिताचे स्वप्न होते. जेव्हा याविषयी सलमानला कळले, तेव्हा त्याने आपल्या लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता अर्पिताच्या इच्छेप्रमाणे वेडिंग व्हेन्यू निश्चित केला.
सलमान खानने फलकनुमा पॅलेस तीन कोटींमध्ये बूक केला आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी ग्रँड रुम्स उपलब्ध आहेत. तर वधू आणि वरासाठी पाच लाख रुपये प्रतिदिन भाडे असलेले प्रेजिडेंशियल सुएट बूक करण्यात आले आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी अर्पिताचे लग्न असून याच दिवशी सलीम खान आणि सलमान खान यांच्या लग्नाचा 50 वाढदिवससुद्धा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फलकनुमा पॅलेसची खास छायाचित्रे...