आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बहिणीने केले बॉयफ्रेंडसह Outing, पुढील वर्षी अडकणार लग्नगाठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयुष शर्मा आणि अर्पिता खान)
मुंबई - सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासह दिसली. दोघेही एकाच गाडीतून फिरताना दिसले. खान कुटुंबाकडून या दोघांच्या लग्नाला हिरवा कंदील मिळाला असून पुढील वर्षी 26 जानेवारीला हे दोघे लग्नगाठीत अडकणार आहेत.
आउटिंगवेळी अर्पिता कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तर दुसरीकडे आयुष ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. त्याने ब्लॅक जीन्स, ब्लॅक टी-शर्ट परिधान केली होती.
अलीकडेच सलमान खानने त्याच्या पनवेल स्थित फार्महाऊसमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतच आयुषच्या आईवडिलांची भेट घेऊन खान कुटुंबाने दोघांचे लग्न निश्चित केले.
अर्पिता आणि आयुष मागील काही महिन्यांपासून एकत्र आहेत. आयुषने अलीकडेच
अर्पितासोबतचे एक छायाचित्र पोस्ट करुन ट्विट केले, ''जेव्हाही मी अर्पितासोबत असतो, तेव्हा एक क्षणही वाया जात नाही.''
आयुष मुळचा दिल्लीचा असून अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. अर्पितासह त्याची भेट एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आयुषसोबतची अर्पिताची छायाचित्रे...