आयुष शर्मा आणि सलमानची बहीण अर्पिता खान
मुंबई: सलमान खानची बहीण अर्पिता शुक्रवारी (25 जुलै) मुंबईच्या रॉयल्टी क्लबच्या बाहेर दिसली. यावेळी तिच्यासह कथित बॉयफ्रेंड आयुष शर्मासुध्दा दिसला. दोघे जेव्हा क्लबच्या बाहेर पडले तेव्हा रिमझिम पाऊस चालू होता. नेहमी कॅज्युअल लूकमध्ये दिसणारी अर्पिता यावेळीसुध्दा अर्पिता साध्याच लूकमध्ये दिसली.
अर्पिताने काळ्या रंगाची जीन्स आणि ब्लेझर परिधान केले होते. तिच्या टॉपवर अनेक लॉयन्स दिसून येत होते. तसेच केस खुले ठेवलेल्या अर्पिताने हातात क्लचर पकडलेले होते. तिच्याकडे एक केशरी रंगाची हँड बॅगसुध्दा होती. दुसरीकडे, तिचा कथित बॉयफ्रेंड आयुषसुध्दा कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने निळ्या रंगाची जीन्स आणि शर्ट घातलेला होता.
बातमी अशीही आहे, की अर्पिताचे आयुषसह लग्न ठरलेले असून पुढील वर्षांत ते लग्नगाठीत अडकण्याची शक्यता आहे. त्याने अर्पितासह एक फोटो पोस्ट करून लिहिले होते, 'जेव्हा अर्पितासोबत असते तेव्हा एकही क्षण एकटे वाटत नाही.'
अर्पिता आणि आयुषचे मागील काही महिन्यांपासून अफेअर चालू आहे. दोघे एकमेकांप्रति खूप गंभीर आहेत. आयुष दिल्लीचा राहणारा आहे आणि बॉलिवूडमध्ये अभिनयामध्ये काम कमावण्याची त्याची इच्छा आहे. दोघांची एका पार्टीत भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयुष शर्मा आणि सलमानची बहीण अर्पिता खानची छायाचित्रे...