आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी कुटुंबीयांसह हैदराबादला रवाना झाली अर्पिता, पाहा Spotted Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडूनः सोहेल खान, सलमा खान, हेलन, सलीम खान आणि अर्पिता)
मुंबईः सलमान खानची बहीण अर्पिता हिचे मंगळवारी (18 नोव्हेंबर) हैदराबाद येथे लग्न आहे. आज अर्पिता आपल्या कुटुंबीयांसह मुंबईहून हैदराबादला रवाना झाली. यावेळी मुंबई विमानतळावर अर्पिता आपल्या कुटुंबीयांसोबत दिसली. हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा हॉटेलमध्ये हा शाही लग्नसोहळा होणार आहे.
विमानतळावर अर्पिता रेड-व्हाइट सलमाव-सूटमध्ये दिसली. यावेळी तिच्यासोबत भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान दिसले. याशिवाय तिच्या दोन्ही वहिनी मलायका अरोरा खान आणि सीमा खानसुद्धा सोबत होत्या. कुटुंबातील बच्चेमंडळीसुद्धा येथे दिसली. अर्पिताचे वडील सलीम खान, आई सलमा आणि हेलन, विवान शाह, गायक अभिजित भट्टाचार्य हैदराबादला रवाना झाले.
यावेळी सलमान खान यांच्यासोबत दिसला नाही. सलमान सध्या लग्नाच्या तयारी व्यग्र आहे. तो दुस-या फ्लाइटने हैदराबादला पोहोचणार आहे. या लग्नात बॉलिवूडसोबतच बिझनेसमन आणि राजकीय वर्तुळातील मंडळी हजेरी लावणार आहे. शाहरुख खानसुद्धा लग्नात सहभागी होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुंबई विमानतळावर क्लिक झालेली खान कुटुंबीयांची खास छायाचित्रे...