आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूर होता अर्पिताचे First Love, यांच्याशीही जुळले होते सलमानच्या बहिणीचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या फोटोमध्ये अर्जुन कपूर, दुस-या फोटोमध्ये अंगद बेदी आणि अर्पिता)
काही तासांतच सलमान खानची बहीण अर्पिता लग्नगाठीत अडकणार आहे. अर्पिता आणि आयुष यांच्या नात्याविषयी माहित होताच कुटुबीयांनी दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतला. अर्पिताचे लग्न ग्रँड इव्हेंट मानले जात आहे. अनेक कलाकार आणि दिग्गज या लग्नात सहभागी होणार आहेत.
अर्पिताचा भावी पती आयुष दिल्लीचा असून राजकारणाशी संबंध असलेल्या कुटुंबातून आहे.
अर्पिता फिल्म इंडस्ट्रीपासून चार हात लांब असली तरी बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे तिचे नावदेखील अनेक तरुणांशी जोडल्या गेले आहे. तिचे पहिले प्रेम अभिनेता अर्जुन कपूर होता. दोघांची अर्जुनची आई मोना कपूर यांच्या निधनानंतर खूप जवळीक वाढली होती. बातम्यांनुसार, अर्पिताने अर्जुनच्या पहिल्या 'इश्कजादे' सिनेमासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते.
मात्र, काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. परंतु अर्जुन आणि सलमान यांच्यातील नाते जसे होते तसेच राहिले. '2 स्टेट्स'च्या रिलीजवेळी अर्जुन कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते, की सलमानचा 'सलाम-ए-इश्क' सिनेमात तो असिस्टंट म्हणून काम करत होता आणि त्यावेळी त्याचे अर्पितासोबत अफेअरसुध्दा होते. अर्पितासोबतच्या ब्रेकअपनंतर त्याला सलमानची खूप भिती वाटत होती. परंतु सलमानचे मोठेपण आहे, की त्याने पर्सनल लाइफ मध्ये न आणता प्रोफेशन लाइफमध्ये मला मदत केली.
शिवाय अर्पिताचे नाव दीपिका पदुकोणचा एक्स-बॉयफ्रेंड निहार पांड्या, क्रिकेटर अंदर बेदीसोबत जुळले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अर्पिताच्या अफेअर्सविषयी...