आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे अर्पिता, 5 बहीणभावंडांमध्ये आहे सर्वात लहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः आपल्या कुटुंबासोबत अर्पिता खान)
मुंबईः सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिचे लग्न बी टाऊनमधील यावर्षातील सर्वात मोठा सोहळा आहे. पाच बहीणभावंडांमध्ये सर्वात लहान असलेली अर्पिता सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. असे म्हटले जाते, की सलीम खान आणि हेलन यांनी अर्पिताला ती खूप लहान असताना दत्तक घेतले होते.
इंटरनेटवर अर्पिताविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. एका वृत्तानुसार, अर्पिता सलीम आणि सलमा खान यांची दत्तक मुलगी आहे, तर एका माहितीनुसार, हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतले आहे. असेही म्हटले जाते, की हेलन यांनी अर्पिताला फुटपाथवरुन घरी आणले होते. हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न केल्यानंतर सलीम यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते. हेलन आणि सलीम खान यांना संतान नसल्यामुळे त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले. तेव्हापासून ती खान कुटुंबात सामील झाली. खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य अर्पितावर खुप प्रेम करतात. विशेषतः अर्पिता सलमानच्या खूप जवळ आहे.
असो, सत्य काहीही असले तरीदेखील अर्पिता आज एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीये. अर्पिताच्या सर्व बहीणभावांनी तिच्या लग्नातील प्रत्येक क्षण स्पेशल बनवण्यासाठी खूप तयारी केली आहे. आपल्या या लाडक्या बहिणीच्या लग्नात सलमान, अरबाज आणि सोहेल खान यांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाहीये.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्पिताचे आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबतचे खास क्षण...