आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Books Taj Lands For Sister Arpita's Reception

आज आहे सलमानची बहीण अर्पिताचे Wedding Reception, पाहा लग्नाची नवीन छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या मित्रांसोबत आयुष आणि अर्पिता)
मुंबईः सलमान खानची बहीण अर्पिता हिचे हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये धुमधडाक्यात लग्न झाले. दिल्ली स्थित बिझनेसमन आयुष शर्मासोबत अर्पिता लग्नबेडीत अडकली. या लग्नात बी टाऊनमधील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. खान कुटुंबीयांसोबतच सेलिब्रिटींनीसुद्धा लग्नात भरपूर एन्जॉय केले. 18 नोव्हेंबर रोजी लग्न झाल्यानंतर आज मुंबईत अर्पिता आणि आयुषचे वेडिंग रिसेप्शन आहे.
मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीतसुद्धा अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. बॉलिवूडसोबतच बिझनेस आणि राजकीय वर्तुळातील मान्यवर रिसेप्शनला हजेरी लावणार असल्याचे समजते. अनेकजण हैदराबादमध्ये आयोजित लग्नात सहभागी होऊ शकले नव्हते. अभिनेता शाहरुख खान आपल्या कुटुंबासह लग्नात सहभागी होणार आहे.
वांद्रा पश्चिममध्ये असलेल्या हॉटेल ताज लँड्स अँड मुंबईतील एलीट क्लासची पहिली पसंत आहे. यापूर्वी आमिर खानचा भाचा इमराज खान आणि अवंतिकाचे रिसेप्शन याच हॉटेलमध्ये झाले होते. याशिवाय अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचीही रिसेप्शन पार्टी येथेच आयोजित करण्यात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आयुष आणि अर्पिताच्या लग्नाची नवीन छायाचित्रे...