(आयुषला वरमाळा घालताना अर्पिता)
मुंबई- मंगळवारी (18 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये सुपरस्टार
सलमान खानची बहीण अर्पिता खान लग्न बंधनात अडकली. तिने दिल्लीचा आयुष शर्मासोबत लग्न केले. या लग्नात आयुष, अर्पिताच्या कुटुंबीयांशिवाय
कतरिना कैफ,
आमिर खान, कबीर खान आणि मिनी माथुरसह बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
अर्पिताच्या लग्नाच्या विधींना शुक्रवारी (14 नोव्हेंबर) दिल्लीमध्ये तिच्या गृहप्रवेशाने सुरुवात झाली होती. त्यानंतर हळद, मेंदीची विधी 16 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रा परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेन्टमध्ये पार पडल्या.
याच दिवशी ताज हॉटेलमध्ये संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. दुस-या दिवशी खान कुटुंबूीय हैदराबादला रवाना झाले. येथील फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आणि आयुष लग्नगाठीत अडकले.
लग्नापूर्वी सासरी अर्पिताचा गृहप्रवेश झाला, त्यानंतर हळद, मेंदी, संगीत सेरेमनी आणि नंतर हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये लग्न.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नात आलेल्या पाहुण्यांची आणि लग्नाच्या विधींची छायाचित्रे...