मुंबई- बॉलिवूड अभिनेता
सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या लग्नाचा विधी हैदराबाद येथील 'फलकनुमा पॅलेस'मध्ये झाला. खान कुटुंबीयांच्या उपस्थितीत अर्पिताने आयुषच्या गळ्यात वरमाळा घातली. वरमाळाच्या विधीवेळी सलमान
आपल्या बहिणीच्या शेजारी उभा होता. सलमान यावेळी भावूक दिसला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूही तराळले होते.
माणसाचे आयुष्य कधी कसे बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. मुंबईच्या फुटपाथवर आईचे निधन झाल्याने रस्त्यावर रडत बसलेल्या अनाथ मुलीला एक कुटुंब मानवतेच्या भावनेतून घरी आणते, दत्तक घेते. पालनपोषण करून मोठे केलेल्या या मुलीचे एखाद्या राजकुमारीप्रमाणे धूमधडाक्यात लग्नही लावून दिले जाते. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा जीवनानुभव घेतलेली नववधू बॉलिवूड स्टार
सलमान खानची बहीण अर्पिता आज आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचली आहे. सलमानसह त्याचे वडील सलीम खान यांनी या अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. ती घरात आल्यामुळे खान परिवाराची भरभराट झाली, अशी सलमानच्या कुटुंबीयांची भावना आहे. त्यामुळे अर्पिता ही खान परिवाराची अत्यंत लाडकी कन्या. तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करण्यास खान परिवार एका पायावर तयार असतो. त्याचमुळे तिच्या आयुष्यातील सर्वोच्च महत्त्वाचा क्षण असलेला विवाह सोहळाही अतिभव्य व्हावा, अशी
सलमान खान कुटुंबीयांची इच्छा होती आणि त्यानुसारच मंगळवारी हैदराबादेत हा भव्य सोहळा पार पडला.
न्यूझीलंड आणि बोरोबोरामध्ये हनिमून
हैदराबादेतील राजवाड्यात अर्पिता- आयुषचा भव्यदिव्य विवाह सोहळा, २१ नोव्हेंबरला मुंबईत शाही रिसेप्शन
आयुषशी बांधल्या गाठी : हैदराबादेतील सातवा निझाम मेहबूब अली खानचा पूर्वी राजवाडा असलेला आज ताज फलकनुमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये अर्पिता बॉयफ्रेंड आयुष शर्माशी विवाहबद्ध झाली. या हॉटेलचे दोन दिवसांचे भाडे दोन कोटी असल्याचेही सांगितले जाते. आयुष हा दिल्लीस्थित व्यावसायिक असून त्याला चित्रपटात नायक बनायचे आहे. काँग्रेस नेते सुखराम शर्मा यांचा तो नातू, तर हिमाचल प्रदेशमध्ये मंत्री अनिल शर्मा यांचा पुत्र आहे.
१८ तारखेचे महत्त्व : अर्पिता२०१३ पासून दिल्ली येथील व्यावसायिक आयुष शर्मा याच्याबरोबर डेटिंग करत होती. या दोघांच्या लग्नाला सगळ्यांची मंजुरी होती. दोघेही जानेवारीत लग्न करणार होते; परंतु सलीम- सलमाच्या लग्नाचा वाढदिवस १८ नोव्हेंबर रोजी असल्याने अर्पिताने हीच तारीख लग्नासाठी निवडली.
खास मेनूचा बेत
याविवाह सो हळ्याला
आमिर खान, करण जोहर यासह बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. निमंत्रितांसाठी खास मेनू ठेवण्यात आला होता. यामध्ये बिर्याणी, हलीम, पत्थर का गोश्त याचा समावेश होता. अर्पितासाठी अबू जानी, संदीप खोसला यांनी विशेष ड्रेस तयार केला होता, तर २१ नोव्हेंबरला मुंबईत होणार्या रिसेप्शनसाठी फाल्गुनी आणि शेन पिकॉकने ड्रेस तयार केला आहे. मुंबईत झालेल्या संगीत समारंभासाठी राघवेंद्र राठोडने ड्रेस तयार केला होता.
थ्रीबीएचके फ्लॅटची भेट
सलमान खानने आपल्या बहिणीकरिता मुंबईतील आपल्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर एक थ्री बीएचकेचा टेरेस फ्लॅट भेट म्हणून दिला असून याची किंमत १६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयुषने जेव्हा अर्पिताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले तेव्हा सलमानचे डोळे पाणावले होते. त्याने आयुष-अर्पिताच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशिर्वाद दिलेत.