आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arpita's Mehndi Ceremony Held In Galaxy Apartment

अर्पिताच्या हातावर चढला मेंदीचा रंग आणि लागली हळद, गॅलेक्सीमध्ये पार पडल्या विधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्पिता खान कुटुंबीय आणि मैत्रिणींसोबत)
मुंबईः अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. अलीकडेच दिल्लीत गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम झाला. यावेळी खान कुटुंब वास्तव्याला असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर फुलांची सजावट रोशनाई करण्यात आली होती.
अर्पिताचा मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम खासगी होता. यामध्ये खान कुटुंबाचे निवडक मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. एकीकडे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अर्पिताचा मेंदीचा कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे बाहेर सलमानच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. गॅलेक्सीसमोरचा रोड जाम झाला होता. सलमानचे बॉडीगार्ड्स गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईतील वांद्रास्थित हॉटेल ताजमध्ये अर्पितासाठी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटला करण्यात आलेली सजावट आणि रस्त्यावर जमलेली गर्दी...