आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सलमान खानच्या बहिणीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका, पाहा निवडक PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमानच्या बहिणीची लग्नपत्रिका)
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचे येत्या 18 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. अर्पिताच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापून आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिका खूप आकर्षक असून त्यावर इंग्रजीमध्ये 'AA' लिहिण्यात आले आहे. अर्पिताच्या भावी पतीचे नाव आयुष आहे. कार्ड एका बॉक्समध्ये पॅक करुन बॅगेत ठेऊन पाहुण्यांना देण्यात येत आहे. लग्नाच्या तयारीत स्वतः सलमान खूप बिझी आहे.
बहिणीच्या लग्नासाठी सलमानने एक शानदार हॉटेल बूक केले आहे. हे हॉटेल एक आठवड्यासाठी तीन कोटी रुपयांत बूक करण्यात आले आहे. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे 40 लाख रुपये आहे. या पॅलेसचे एकुण 60 सुएट तब्बल 250 पाहुण्यांसाठी बूक आहेत. यापैकी 46 रुम नॉर्मल गेस्टसाठी तर व्हीआयपी गेस्टसाठी 3 ग्रॅण्ड सुएट, 7 रॉयल सुएट आणि 3 हिस्टोरिकल सुएट बूक करण्यात आले आहेत. वधू आणि वरासाठी प्रेजिडेंशिअल सुएट बूक करण्यात आले आहे. या पॅलेसशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रिजिडेंशिअल सुएटचे एका दिवसाचे भाडे 5 लाख रुपये आहे. तर बेसिक रुम्सचे भाडे 40 हजार रुपये प्रतिदिन आहे.
विशेष म्हणजे सलमानने किंग खान शाहरुखलासुद्धा आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आमंत्रित केले आहे. आता शाहरुख सलमानचे आमंत्रण स्वीकारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताच्या लग्नपत्रिकेची खास छायाचित्रे...