आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arrest Warrants Issued Against Deepika Padukone, Ranveer Singh And Sanjay Leela Bhansali

दीपिका, रणवीर आणि संजय लीला भन्साळींविरोधात अटक वॉरंट जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याविरोधात आज (3 मे) अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. 'गोलियों की रासलीला-रामलीला' या सिनेमात अश्लीलता आणि हिंसाचाराने कळस गाठला असून त्यामध्ये हिंदूंच्या भावना देखील दुखावल्या गेल्याच्या आरोपाअंतर्गत हा अटक वॉरंट जारी करण्यात आला.
याशिवाय निर्माते किशोर लुल्ला आणि गीतकार एस.पी सिंग यांनाही अटक करण्याचे आदेश मुझफरपूर येथील मुख्य न्यायलयीन दंडाधिका-यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.
येत्या 4 जून रोजी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यासाठी मुंबई पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.
वकिल सुधीर कुमार ओझा यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये सिनेमात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले होते. त्यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला.