आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Bhootnath Returns Satellite Rights, Divymarathi

बिग बींनी 25 कोटींमध्ये दिले 'भूतनाथ रिटर्न्स'चे अधिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकूण 25 कोटीत तयार झालेल्या 'भूतनाथ रिटर्न्‍स'ने पहिल्या आठवड्यात 14 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत अमिताभ यांनी हे यश बी. आर. फिल्म्सचे मालक रवी चोप्रा यांना सर्मपित केले. रवी पाच वर्षांपासून कोमात आहेत. ते लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी या वेळी केली. अमिताभ यांनी चित्रपटातील बाल कलाकार पार्थला उत्कृष्ट कलाकाराच्या नामांकनासाठी शुभेच्छा दिल्या आाहेत.
या चित्रपटाच्या निर्मिती कंपन्या बी. आर. चोप्रा फिल्म्स आणि टी-सिरीज यांच्याऐवजी अमिताभ बच्च्न यांनी चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार सोनी चॅनेलला दिले. यामुळे त्यांच्यासह निर्मात्यांचाही फायदा झाला आहे.
अमिताभ यांनी 90च्या दशकात खूप नुकसान सहन केले असले तरी आजही ते निष्णात व्यावसायिक आहेत. बॉलिवूडमधील कोणत्याही सिनेतार्‍यापेक्षा ते जास्त व्यग्र आहेत. नुकताच त्यांनी केलेल्या एका सौद्यामुळे निर्मात्यांसह त्यांनासुद्धा फायदा झाला. गेल्या सात वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती'मुळे त्यांचे आणि सोनी चॅनेलचे खूप जवळचे नाते बनले आहे. त्यांची कंपनी एबीसीएल कॉर्प निर्मित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित पहिल्या फिक्शन शोचे अधिकारीही सोनीकडे आहेत. सोनीशी असलेल्या संबंधांमुळे 'भूतनाथ रिटर्न्‍स'चा सॅटेलाइट सौदा निर्मिती कंपन्या बी. आर. फिल्म्स आणि टी-सिरीज यांच्याऐवजी स्वत: अमिताभ यांनी केला. 2008 मध्ये आलेल्या 'भूतनाथ'ने बॉक्स ऑफिसवर सरासरी यश मिळवले होते, परंतु टीव्हीवर या चित्रपटाची रिपीट व्हॅल्यू आज सहा वर्षांनंतरही चांगली आहे. हे पाहता अमिताभ यांनी आधी निर्मात्यांकडून सॅटेलाइट अधिकार 18 कोटींत स्वत: खरेदी केले. तथापि, त्यांचे सोनीसोबत चांगले संबंध असल्याने बाजारात चित्रपट विकण्यापूर्वी त्यांनी चॅनेलला प्रस्ताव पाठवला.
आपल्या सुपरस्टारचा चित्रपट सोडण्याची सोनी चॅनेलचीदेखील इच्छा नव्हती. सूत्रांच्या मते, अमिताभ यांनी 18 कोटींत स्वत: खरेदी केलेला चित्रपट 7 कोटींचा नफा मिळवत 25 कोटींत विकला. चॅनेलशी संबंधित तज्ज्ञांनी हा फायद्याचा सौदा असल्याचे सांगितले आहे. मुद्दा अमिताभ यांना झालेल्या 7 कोटींच्या नफ्यापेक्षा त्यांच्या मार्केटिंग कौशल्याचा आहे. हे कौशल्य कोणत्याही एमबीए संस्थेतून मिळवता येऊ शकत नाही.
सॅटेलाइटच्या 18 कोटींतून अमिताभ यांनी आपल्या निर्मात्यांचाही फायदा केला. कारण ते बाजारात चित्रपट विकण्यासाठी गेले असते तर त्यांना 15 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला नसता. सोनी चॅनेलनेसुद्धा अमिताभ यांच्या प्रस्तावात फायदाच बघितला. कारण लहान मुलांच्या चित्रपटांची टीआरपी जास्त आहे.