आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Changes In Marathi Cinema, Divya Marathi

मराठी चित्रपटांचे देशाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या प्रदेशांचे कुतूहल प्रेक्षकाला असते, हे लक्षात घेऊन मराठी चित्रपट पडद्यावर महाराष्ट्राबाहेरची दृश्ये दाखवायला लागला आहे.

कोल्हापूरपुरताच अडकलेला मराठी चित्रपट महाराष्ट्रातील विविध ठिकाणे शोधू लागला. त्यात सातारा-वाईपासून छोटी छोटी शहरेदेखील चित्रीकरणच्या दृष्टिक्षेपात यायला लागली. इथपासून मराठी चित्रपट तांत्रिक कारणांसाठी, शोजसाठी परदेशात जायला लागला. प्रेक्षणीयतेबरोबर नव्या प्रदेशांचे कुतूहल प्रेक्षकाला असते, हे लक्षात घेऊन मराठी चित्रपट पडद्यावर महाराष्ट्राबाहेरची दृश्ये दाखवायला लागला आहे. नुकतेच ‘यलो’ चित्रपटातील पाण्याखालचे चित्रीकरण बॅँकॉक येथे करण्यात आले. ऑस्करसाठी मराठी चित्रपटाची स्वारी भारताबाहेर जायला लागली. मी व मृणाल कुलकर्णी मिळून झी चॅनेलवर ‘हॅपी जर्नी’ ही पर्यटनावर आधारित मालिका केली होती. र्शीलंका, नेपाळसारखे देश त्यात आम्ही दाखवले होते.
सांगायचा मुद्दा हा की, मराठी चित्रपट या ना त्या कारणाने चित्रीकरणाच्या व पर्यटनाच्या सीमा ओलांडतो आहे. मिफ्टासारखे पुरस्कार सोहळे परदेशात होतात. सेलिब्रिटी टूर पॅकेजेसच्या माध्यमातून तर कलाकारांना सामान्य माणसाच्या पर्यटनाशी कनेक्ट होता आले. त्यामुळे मराठी चित्रपटाच्या ग्लॅमरमध्ये भर पडते आहे. या बदलामुळे चित्रपटाचे आशय-विषयदेखील विस्तारतात हे खरे आहे. शिवाय या बदलांमुळे मराठी कलाकारांचे देशाटनही वाढले आहे.