आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Dada Saheb Phalke Award, Gulzar, Divyamarathi

प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना जाहीर झाला आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्वर्णकमळ, शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या पुरस्कारासाठी अभिनेता जितेंद्र यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांच्या नावावर फिल्म इंडस्ट्रीकडून एकमत होऊ शकले नाही. सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी देशभक्तीपर सिनेमांची निर्मिती करणा-या मनोज कुमार यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र अखेर
गुलजार यांची निवड 45व्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली.
गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंग कालरा असून 18 ऑगस्ट 1936 रोजी सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतातल्या दिना शहरात शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. देशाच्या विभाजनावेळी फाळणीचे चटके गुलजार यांनी सहन केले. फाळणीनंतर कालरा कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. दिल्लीत उदरनिर्वाहासाठी त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून देखील काम केले होते. गुलजार या टोपणनावाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. ‘रावी पार’ आणि ‘धुँवा’ हे लघुकथासंग्रह त्यांनी लिहिले.
पुढे त्यांनी मालिका आणि सिनेमांसाठी लिखाण सुरु केले. गीतकार, कवी, पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. बिमल रॉय यांच्या 'बंदनी'साठी गुलजार यांनी पहिले गीत लिहिले होते. 1971 साली त्यांनी 'मेरे अपने' या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून आपले करिअर सुरु केले. दूसरी सीता, इजाजत, ओमकारा, रेनकोट, पिंजर, दिल से, आँधी, यांसारख्या गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखन केले.

कृतार्थ झालो !
आज खरोखरच गुलजार नव्हे कृतार्थ झालो, अशी भावना प्रख्यात गीतकार गुलजार यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. काय बोलावं? मी आनंदाने अगदी मोहरून गेलो असून अवघ्या कार्याच्या सन्मानाबद्दल कृतार्थतेची ही अनुभूती मनात उमटली आहे. सर्वांच्या प्रेम व प्रोत्साहनाबद्दल मी शुक्रगुजार आहे, असेही गुलजार म्हणाले. तेरे बिना जिंदगी से, तुझसे नाराज नहीं अशी असंख्य चिरस्मरणीय गीते लिहिणारे गुलजार हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे 45 वे व्यक्ती आहेत. याआधी त्यांना 2002 मध्ये साहित्य अकादमी, 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. अनेक राष्ट्रीय पुरस्काराशिवाय 20 फिल्मफेअर अवॉर्ड त्यांच्या खात्यात आहेत.
20 वेळा फिल्मफेअर अवॉर्डचे मानकरी -
गुलजार सर्वाधिक म्हणजे तब्बल 20 वेळा फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हा एक विक्रम आहे. 2004मध्ये गुलजार यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
गुलजार यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे -
मेरे अपने (1971)
परिचय (1972)
कोशिश (1972)
अचानक (1973)
खुशबू (1974)
आँधी (1975)
मौसम (1976)
किनारा (1977)
किताब (1978)
अंगूर (1980)
नमकीन (1981)
मीरा
इजाजत (1986)
लेकिन (1990)
लिबास (1993)
माचिस (1996)
हु तू तू (1999)
पुढील स्लाईड्मध्ये पाहा गेल्या काही वर्षांत कोणकोणते सेलिब्रिटी ठरले दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी...