आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Selection Of Actors In Marathi Film Fandry, Divya Marathi

जाणून घ्या \'फँड्री\'साठी नागराज मंजुळेंना कसे गवसले जब्या, प-या आणि शालू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' सिनेमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सिनेमामुळे नागराज मंजुळेसारखा संवेदनशील दिग्दर्शक मराठीला लाभला आहे. सर्व कलाकारांनी सिनेमात उत्तम अभिनय वठवला आहे. किशोर कदम, छाया कदम हे कलाकार सोडले तर सिनेमातील जवळपास सर्वच सदस्य नवोदित आहेत. मात्र या कलाकारांचा अभिनय पाहून ते नवोदित आहेत, असं कुणालाही वाटणार नाही. खरं तर ही कला दिग्दर्शकाचीच. नागराज मंजुळे यांनी प्रत्येक कलाकारातील लपलेला अभिनय हेरुन तो उत्तमरित्या पडद्यावर आणला आहे.
जब्याची भूमिका करणारा सोमनाथ अवघडे, त्याच्या मित्राची भूमिका साकारणारा प-या अर्थातच सूरज पवार आणि जब्याचं जिच्यावर मनापासून प्रेम आहे ती शालू म्हणजेच राजेश्वरी खरात या तिन्ही मुलांनी आपल्या अभिनयाने सिनेमात जीव ओतला आहे.
'फँड्री'साठी या तिघांची निवड होणं, हा खूप रंजक प्रवास आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना उत्कृष्ट अभिनय केलेल्या या तिन्ही कलाकारांची सिनेमासाठी निवड कशी झाली हे सांगतेय या सिनेमाची सहायक दिग्दर्शिका आणि वेशभूषाकार गार्गी कुलकर्णी...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या गार्गी कुलकर्णी यांनी या तिघांच्या निवडप्रक्रियेविषयी सांगितलेले रंजक किस्से...