आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जाने कहां गए वो दिन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज कपूर यांचा 2 जूनला स्मृतिदिवस होता. मागील दोन दशकांत समाज आणि सिनेमात वेगाने परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या महोत्सवावेळी आज राज कपूर जिवंत असते तर रस्त्यावर नाचले-गायले असते, कारण चित्रपटच त्यांचे पहिले प्रेम आणि विचाराचे केंद्र होते. व्ही शांताराम, गुरुदत्त आणि सत्यजित रे अशा चित्रपट निमार्त्यांकडे चित्रपटाशिवाय दुसरी योग्यता होती.
सत्यजित रे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत पुस्तकांच्या कव्हर आणि आतील पानावर रेखाचित्र बनवण्यात निपुण होते. गुरुदत्त यांनी पं. उदयशंकर यांच्या शाळेत शास्त्रीय नृत्य िशकले होते. फक्त राज कपूर हेच सिनेमा व्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते. ते दहावी नापास होते. ते फक्त सर्कसमध्ये ‘जोकर’चे काम करू शकले असते किंवा आवारा भटकले असते. त्यांचा जन्मच चित्रपट कलेत व्यक्त होण्यासाठी झाला होता.
राज कपूर यांनी आठ वर्षांचे असताना चित्रपटाच्या जाहिराती आणि चित्र चिटकवून एक स्क्रॅप बूक तयार केले होते. ते आजही कृष्णा राजकपूर यांनी जपून ठेवले आहे. तारुण्यात त्यांना एका किशोरवयीन मुलीशी प्रेम झाले होते, दोघांच्या कुटुंबाचा परिचय होता. त्यामुळे लग्न शक्य होते. मुलीच्या वडिलाने राज कपूर यांना एकुलत्या एका मुलीशी लग्नानंतर घरजावई करून त्यांची शेकडो एकर जमीन आणि व्यवसाय सांभाळण्याचे सांगितले. राज कपूर यांचे मुलीवर मनापासून प्रेम करत होते; पण चित्रपट निर्माता होण्याचे स्वप्न बाळगल्यामुळे त्यांना घरजावई होणे मंजूर नव्हते. त्यामुळे त्यांचे हे लग्न होऊ शकले नाही. परतताना राजकपूर यांना मुलीची भेट घेतली त्या वेळी ती मुलगी अंगठा दाखवत त्यांना, म्हणाली, ‘फिर ना आना इन गलियों चौबारों में’ या घटनेच्या अनेक दशकानंतर ‘प्रेम रोग’मध्ये सावकाराची लाडकी मुलगी, अंगठा दाखवत ‘ये गलियां ये चौबारा, यहां आना ना दोबारा; की तेरा यहां कोई नहीं’. हे गीत म्हणते. या गाण्यात लावण्यात आलेला सेटदेखील त्या सावकाराच्या हवेलीसारखाच होता.
सिनेमामय राज कपूर यांनी आपल्या आयुष्याच्या घटनेवरच अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे ‘लार्जर दॅन लाइफ’ आयुष्यदेखील जगले. ते प्रत्येक वेळेस फक्त दृश्य किंवा कॅमेर्‍याचा विचार करत होते. त्यांचे आयुष्य संपादित नसलेल्या रीलप्रमाणे आहे, हे वाक्य त्यांनी स्वत: लिहिले होते. अधिकांच्या लांबीमुळे दृश्यावर प्रभाव पडतो, तर तेवढय़ाच कमीमुळे दृश्याला नुकसानदेखील होते. (मुलगी रितू नंदा यांनी राज कपूर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या पान 188तून साभार)
वडील पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकातून राज कपूर थोड्याच भूमिकेतून खूप काही शिकले. नाटकानंतर सर्वच कलावंत आणि तंत्रज्ञ प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. कोणत्या दृश्यात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि तो कधी कंटाळला या माहितीच्या आधारे पुढच्या भागाची पटकथा आणि संवाद लिहिले जात होते. राज कपूर यांना प्रेक्षक प्रतिक्रियेचे महत्त्व याच संस्थेतून कळाले. त्यामुळे राज कपूर यांनी कधीच वॉटरटाइट पटकथेवर चित्रपट लिहिला नाही. ते थेट चित्रीकरणाच्या वेळी बदल करत. उटकमंडमध्ये ‘संगम’च्या चित्रीकरणाचे रश पिंट्र पाहून परदेशात चित्रीकरण केल्याचे वाटत होते. हे लक्षात येताच त्यांनी पटकथेत परिवर्तन करून युरोपमध्ये शूटिंग केले. अनेक देशात चित्रीकरण झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. ‘तुम्हे देख के तेरे दिल में हजारों फूल खिलते हैं’ हा संवाद ‘प्रेम रोग’मध्ये होता. यावरून त्यांना कल्पना आली की अँमस्टरडॅममध्ये लाखोंच्या संख्येने ट्युलिप फुले लावली जातात. त्यांनी तिथे जाऊन चित्रीकरण केले.
रितू नंदा यांच्या पुस्तकाच्या पान 158वर राज कपूर यांच्या शेवटच्या दिवसांमधील कथन आहे ‘ मला ज्या ध्येयापर्यंत पोहोचयचे होते, मी तिथपर्यंत पोहोचलो नाही, याचे मला दु:ख आहे. मी देवाला प्रार्थना करतो की, ज्या वेळी मी काम सुरू केले आहे, त्यावेळी मला नेऊ नकोस. देवाने दिलेल्या देणगीनुसार नियती आपल्याला यशोशिखर गाठण्याचे शिकवते; पण त्या वेळी कळते की शिकण्यात खूप वेळ गेला आणि आता जाण्याची वेळ झाली’ कितीतरी पटकथा ते आपल्यासोबत घेऊन गेले असतील.
आणखी एक कपूर मैदानात