आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aseem Merchant Unperturbed By Priyanka Chopra's Legal Notice

प्रियांकाच्या नोटिसीनंतरही होणार ‘67 डेज’ची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने ‘67 डेज’ची निर्मिती करणे बंद करावे, अशा आशयाची कायदेशीर नोटीस तिचा माजी प्रियकर असीम मर्चंटला दिली होती. तिचे म्हणणे होते की, हा सिनेमा केवळ तिचा माजी सचिव प्रकाश जाजूचा बायोपिक नसून त्यात तिच्या खासगी जीवनातील वैयक्तिक पैलूदेखील दाखवण्यात येणार आहेत. मात्र, प्रियांकाच्या या नोटिसीचा सिनेमा निर्मात्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून येते आहे.
असीमची लाइमलाइट मोशन पिक्चर्स एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या सिनेमाची निर्मिती करणार आहे. असीमने सांगितले की, ‘आम्ही दबाव टाकणार्‍यांसमोर हार मानणार नाही. आम्ही या सिनेमाच्या निर्मितीचे काम सुरू केले आहे. प्रियांकाच्या कायदेशीर नोटिसीचे आम्ही उत्तरही दिले आहे.’ याबाबत प्रकाश जाजूने सांगितले की, ‘मी आपल्या बायोपिकचे अधिकार लाइमलाइट कंपनीला विकले आहेत. त्यांनी सिनेमा बनवणार असल्याचे मला सांगितले आहे.’ या व्यतिरिक्त प्रकाशने काहीही बोलण्यास नकार दिला. कारण त्याला असीमकडूनच तसे आदेश आहेत.