आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : सस्पेन्स, थ्रिलरचा तडका असलेला 'अशाच एका बेटावर'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अशाच एका बेटावर' हा सिनेमा एका सस्पेन्स थ्रिलर कथानकावर बेतलेला आहे. नऊ अनोळखी व्यक्ती एका सुनसान बेटावरच्या बंगल्यात गूढ रहस्याचा शोध घेण्यासाठी एकत्र येतात. त्यानंतर सुरु होणारी हत्यांची साखळी त्या प्रत्येकालाच पेचात टाकते. मृत्यूचे वाढत जाणारे गूढ प्रत्येकावरच संशय घेते. प्रत्येक नवीन रात्र नवीन रहस्याला जन्म देते आणि यातूनच भयचकीत करुन सोडणा-या घटनांची मालिका वेगाने घडत जाते. ख-या गुन्हेगाराचा शोध नेमका कसा लागतो याचे लक्षवेधी चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.

जाहिरात क्षेत्रात गेली 25 वर्षे फॅशन फोटोग्राफर म्हणून काम करणारे संजू हिंगे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, मधुरा वेलणकर, सई ताम्हणकर, यतिन कार्येकर, शरद पोंक्षे, संजय मोने, मंगेश देसाई, कमलेश सावंत, पूनम जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अलिबागच्या निसर्गरम्य परिसरात या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. येत्या 8 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

विशेष म्हणजे 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या सिनेमानंतर अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा बिकिनीत आपल्याला या सिनेमात दिसणार आहे.

या सिनेमाची खास झलक बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...