आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या रिंगणात अशोक सराफ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवकरच निवडणुकीचा हंगाम सुरु होण्याच्या बेतात आहे. आपल्या पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची धावपळही सुरु झाली आहे. या धामधुमीत एक लोकप्रिय नाव राजकीय आखाड्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अभिनते अशोक सराफ!
हो, हो, तुम्ही बरोबर ऐकताय. अशोक सराफ ज्या भागातून निवडणूक लढवणार आहेत त्यांना सामना करावा लागणार आहे तो सयाजी शिंदे यांचा. आतापर्यंत तुम्ही या दोघांनाही रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते म्हणून पाहिलं आहे. पण, आता आपण त्यांना एक राजकारणी म्हणून पाहणार आहोत. आपल्या अभिनयाने लोकांचं मन आणि प्रेम जिंकून घेणारे हे कलाकार, लोकांचा प्रतिनिधी बनून कशा प्रकारची कामगिरी करतात, ते पाहणं आपल्या सर्वांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरेल. एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या दिग्गज कलाकारांनी एकमेकांची शक्तिस्थळ ओळखून निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली आहे. लोकांना वेगवेगळी आश्वासनं देत, आपल्या बाजूला ओढणं, एकमेकांविरोधात भाषणं देणं अशी सगळी रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. ही सर्व राजकीय लढत सुरु आहे, ती 'सराव प्रॉडक्शन' निर्मित 'खरं सांगू खोटं खोटं' या आगामी चित्रपटात.
'अभिरुची फिल्मस' प्रस्तुत 'खरं सांगू खोटं खोटं' या चित्रपटात अशोक सराफ आणि सयाजी शिंदे हे दोघे निवडणूक लढवताना दिसत असले, तरी हा चित्रपट राजकारणावर आधारित नाहीये. कथेची गरज म्हणून यात निवडणुका पाहायला मिळत आहेत एवढंच. एक आगळीवेगळी धमाल प्रेमकथा हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. जुन्याजाणत्या दोन कलाकारांमध्ये जुंपलेली अभिनयाची ही रणधुमाळी प्रेक्षकांच्या कसोटीवर नक्कीच उतरेल या दोन कलाकारांना तेवढीच तोडीस तोड साथ दिली आहे, ती अनलेश देसाई आणि त्रिशला या फ्रेश जोडीने. त्रिशलाचा हा पहिलाच चित्रपट. पदार्पणातच तिने खूप चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. तर अनलेश देसाई म्हणजे मराठीला मिळालेला एक नवीन देखणा हिरो. हिंदी हिरोप्रमाणे त्याच्याकडे मसल्स पॉवर ठासून भरलेली आहे, तसाच अभिनय सुद्धा! विशेष म्हणजे एका वेगळ्या भूमिकेत निर्मिती सावंतची धम्माल हे सुद्धा या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.