आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक शिंदे यांचे रंगभूमीवर कमबॅक, 'प्रेम... प्रेम असतं'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अभिनेता अशोक शिंदे)
मुंबई - गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये नायक-खलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका साकारणा-या अभिनेता अशोक शिंदे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 111 सिनेमांचा टप्पा ओलांडलेल्या अशोक शिंदे यांनी आजतागायक विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. 1300 भागांची मजल गाठलेल्या 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत त्यांनी साकारलेली यशवंत पाटकर ही भूमिका घराघरांत पोहोचली. आता तब्बल बारा वर्षांनंतर अशोक शिंदे पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. 'प्रेम... प्रेम असतं' या नाटकात अशोक शिंदे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
आजच्या दैनंदिन जगण्यात नातेसंबंधात आलेला ताणतणाव, अविश्वास यावर भाष्य करत हे नाटक नात्यातील मैत्री शोधण्याचाही कानमंत्र देतं. या नाटकात अशोक शिंदे हे प्रितम बांदेकरची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून मैथिली वारंग त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासह पंकज खामकर आणि गौरी देशपांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या नाटकात आहेत.
नाटकाची निर्मिती संतोष आंबेरकर, शेखर मांजवकर यांनी केली असून लेखन-दिग्दर्शनाची धुरा संतोष आंबेरकर यांनी सांभाळली आहे.
सायन्स फिक्शनवर आधारित 'सहकुटुंब डॉट कॉम' असो वा 'मास्टरप्लॅन' सारखे रहस्यमय नाटक, अशोक शिंदे यांनी आपल्या भूमिकांनी प्रत्येक भूमिकेचे सोनं केलयं. त्याचीच प्रचिती आगामी 'प्रेम... प्रेम असतं' या नाटकातून रसिक प्रेक्षकांना येणार आहे. आजपासून (2 जुलै) या नाटकाचा मुंबईत शुभारंभ होतोय.