आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगीतकार अशोक पत्कींच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या मुला-मुलींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. आता हा ट्रेंड हळूहळू मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही रुजू होतोय. अलीकडेच अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या मुलानेही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आता प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगाही अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र चित्रपटांऐवजी तो मराठी मालिकेत झळकणार आहे. आशुतोष पत्की हे अशोक पत्की यांच्या मुलाचे नाव असून वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्राची निवड न करता त्याने अभिनयाला पसंती दिली आहे.

18 फेब्रुवारीपासून ई टीव्ही वाहिनीवर सुरु होणा-या 'मेंदीच्या पानावर' या मालिकेद्वारे आशुतोष अभिनयात आपले पहिले पाऊल ठेवत आहे.

'मेंदीच्या पानावर' या मालिकेत आशुतोषने राघव ही प्रमुख भूमिका साकारली आहे. तर आशुतोषबरोबर अक्षया गुरव प्रमुख भूमिकेत या मालिकेत झळकणार आहे.

दोन विरुद्ध विचारांच्या आणि विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकहाणी 'मेंदीच्या पानावर' या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.