आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asin Replace Aishwarya Rai Bachchan In Maniratnam Film

ऐश्वर्या नव्हे असिन झळकणार मणिरत्नमच्या सिनेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चनने मातृत्वानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी आपल्या आवडीचे दिग्दर्शक मणिरत्नमचा सिनेमा साइन केल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात खूप रंगली होती. ऐश्वर्याने 1997 मध्ये मणिरत्नमच्या ‘इरुवर’ या सिनेमातून आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. हा नवीन सिनेमा मणिरत्नम सुरुवातीला तेलगूमध्ये बनवणार असून त्यानंतर हिंदी प्रेक्षकांसाठी याच सिनेमाचे डब्ड व्हर्जन रिलीज करणार असल्याचे आम्ही यापूर्वीच सांगितले होते.
आता मात्र या सिनेमात फार मोठा फेरबदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मणिरत्नमच्या या आगामी सिनेमातून ऐश्वर्या बाहेर पडली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सिनेमाशी संबंधित असलेल्या लोकांनी अजून केली नाही. मात्र, सूत्रांनुसार ऐश्वर्याच्या जागी ‘गजनी’ फेम असिनची वर्णी लागल्याचे सांगण्यात येत आहे. सिनेमात असिनशिवाय श्रुती हासनदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.